सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेची धाडसी कामगिरी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेची धाडसी कामगिरी

जखमीस रुग्णालयात दाखल करून वाचविले प्राण 

सिएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस हवालदार/३२३८ शिवाजी दादाराव धांडे व पोलीस कॉन्स्टेबल/९३९ वाकडे हे ०९ डिसेंबर २०२० रोजी मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन येथे रात्रपाळी ड्युटी कर्तव्यावर रात्रौ ९ वाजता हजर झाले होते व ते या स्थानकांवर सतर्क राहून आपके कर्तव्य पार पाडत होते.

रात्रौ २१.२० वाजता मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन येथेही ऑन ड्युटी स्टेशन मास्तर यांनी समक्ष येऊन कळविले की, की.मी.न. १/५०३ ते १/५०५ च्या दरम्यान इसम नामे रविकेश रामबदन रावत, वय-३२ वर्ष, धंदा- चहा पावडर विक्री, रहा. रूम न. ११, बीपीटी चाळ, फर्स्ट फ्लाय रोड, दानाबंदर, मस्जिद बंदर येथील व्यक्ती डाऊन गदग एक्सप्रेस  गाडीखाली सापडून त्याच्या उजव्या पायास जबर जखम झालेली दिसल्याने, त्यास तात्काळ स्ट्रेचर ठेवून मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर आणले. सदरचा इसम तेथेच लगतील झोपडपट्टीत राहत असल्याने तेथिल १५ ते २० इसमाचा जमाव जमलेला होता. जखमीस स्थानकावरील ब्रिजवर आणून एक टॅक्सी वाल्यास विनंती केली असता, त्याने जखमीस घेण्यास नकार दिल्याने, जमलेल्या जमावाने त्या टॅक्सी मालकाच्या टॅक्सीचे नुकसान केले. पोलीस अंमलदार धांडे यांनी तात्काळ दुसरी टॅक्सी थांबवून त्यात जखमी इसमास घालून तात्काळ जे.जे रुग्णालय नेले.

जखमी इसमास अधिक उपचार कामी जे. जे. रुग्णालयातील EPR नो. १३७३० अन्वये वार्ड न.०४ बेड न.०३ येथे औषधोपचार कारणेकमी दाखल केले. तेथे ऑन ड्युटी डॉक्टर श्री. कदम यांनी त्यास तात्काळ रक्त मागऊन जखमीस चढविले.
  
जर ३० ते ४० मिनिटं उशीर झाला असता तर अति रक्तस्त्रावामुळे कदाचित जखमी इसमाचा मृत्यू झाला असता असे डॉक्टर यावेळी म्हणाले. 

आमच्या दोन कर्तव्यतत्पर कॉन्स्टेबलमुळे त्या रुग्णाचा जीव थोडक्यात वाचला असे गौरवोद्गार सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. आर. पाल यांनी काढले. 





1 टिप्पणी:

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज