मुंबई, दादासाहेब येंधे : सोमवारी (ता. ०६ जानेवारी) रात्री १० वाजताच्या सुमारास एका व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना मुंबईती घडली आहे.
अंगडीया नावाच्या व्यापाऱ्यावर हा गोळीबार करण्यात आला असून सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील डिमेलो परिसरात ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अंगडीया यांच्यावर गोळीबार केला. या घटनेच्या २४ तासांमध्येच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अंगडीया नामक व्यापारी सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील डिमेलो परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमध्ये अंगडीया यांच्या पायाला गोळी लागली. तर, चोरांनी अंगडीया यांच्याजवळ असलेली मौल्यवान वस्तुंची बॅग घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत जखमी झालेले व्यापारी अंगडीया यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी अंगडीया यांच्यावर एकूण चार गोळ्या झाडल्या. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता.
या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १६,५०,०००/- रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी २४ तासांच्याआत आरोपींना अटक केली आहे. रात्री उशिरा १० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या उद्देशानेच आरोपींनी गोळीबार केला होता. अशी माहिती समोर येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा