मुंबई, दि. २५ : नवबालक क्रीडा मंडळाच्या ५९ व्या वर्षानिमित्त १४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू आणि १७ नोव्हेंबर हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन प्रित्यर्थ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून बालक दिन साजरा करण्यात आला.
लहान मुलांसाठी जत्रेतील खेळणी, जंपिंग बॉल, चक्री, रेल्वे गाडी, बोट यांचे विनामूल्य आयोजन करून त्यांना पॉपकॉर्न, शुगर कँडी, समोसे, आईस्क्रीम असा खाऊ वाटप करण्यात आला. विभागातील लहान मुलांनी बहुसंख्येने एकत्र येत खूप मज्जा करत बालकदिन साजरा केला.
तसेच हुशार विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची प्रश्नोत्तराची स्पर्धा घेऊन कु. यश प्रमोद पाटणकर याची सुरत्न नवबालक पुरस्कारसाठी निवड करण्यात आली. प्रमुख विश्वस्त अनिल हेलेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष मंगेश पिंपरकर व सरचिटणीस योगेश राणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली. मंडळाचे विश्वस्त अनिल घाडीगांवकर यांनी सुरेख निवेदन केले.


0 टिप्पण्या