Zee 24 Taas ने पोलिसांना 'कोविड योद्धा' पुरस्कार देऊन गौरविले - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

Zee 24 Taas ने पोलिसांना 'कोविड योद्धा' पुरस्कार देऊन गौरविले

 महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारीआणि कर्मचारी कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दादासाहेब येंधे :

Covid19 च्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जीवावर उदार होऊन नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या श्री मंजूनाथ शिंगे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-८, मुंबई,  पोलीस अधीक्षक तेजस्वि सातपुते, सातारा, पोलीस आयुक्त आरती सिंह अमरावती शहर, श्री बाळसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक, सायबर मुंबई, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके अहमदनगर, राजेंद्र सिंह नागपूर, पोलीस निरीक्षक, चंद्रकांत लांडगे, कुंडलिक कायगुड, रमेश नागरे, शरद  झिने, निवृत्ती कोल्हटकर, बृहन्मुंबई, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर लोहमार्ग मुंबई, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तोरे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली बोबडे सायबर मुंबई, अनिल डफळ पुणे शहर, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील पुणे शहर, प्रिती शित्रे पोलीस  निरीक्षक पुणे शहर, पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर सांगली, प्रसाद आऊटी सोलापूर  ग्रामीण, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत घागी गडचिरोली, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे गडचिरोली, महिला पोलीस निरीक्षक त्रिशीला गावंडे गडचिरोली, पोलीस कॉन्स्टेबल दर्शन सोनवणे नाशिक शहर या  पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना Zee 24 Taas ने 'कोविड योद्धा' पुरस्कार देऊन गौरविले. 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, पोलीस महासंचालक श्री. सुबोधकुमार जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग आदी  उपस्थित होते.

पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मा. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी Zee 24 Taas चे मनापासून आभार मानले.







व्हायरल फोटो

1 टिप्पणी:

  1. Zee 24 taas चे आभार, तसेच पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन. जय हिंद पोलीस बांधवांनो.

    उत्तर द्याहटवा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज