घरफोडी करणाऱ्या स-हाईत गुन्हेगारास अटक करून खार पोलीस ठाण्याचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले
अंदाजे १५ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
मुंबई, दादासाहेब येंधे : खार पोलीस ठाण गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उ.नि. त्रिमुखे व पथकाने कामोठे नवी मुंबई येथे सापळा लावून खारदांडा परिसरात वारंवार घरफोडी करणा-या अज्ञात चोरट्या इसमास अटक केली.
तपासदरम्यान आरोपीत इसम हा घरफोडी करण्याकरीता त्याचे जवळील मो/सा. व मो/कार चा वापर करून सदरच्या चोरी व घरफोडीच्या पैशातुन चैनेच्या वस्तु खरेदी करून उच्चभ्रू वस्तीत रहावयास असल्यामुळे त्याचेवर कोणाचाही संशय येत नव्हता. मुख्य आरोपीताचा साथिदार हा सोन्याचा कारागीर असून तो मुळ स्वरूपातील सोन्याची मालमत्ता वितळवून लगड बनवुन विक्री करीत असे. त्यास विवीध युक्त्यांचा अवलंब करून पश्चिम बंगाल येथून मुंबईस विमानाने येण्यास भाग पाडून त्यास अटक करण्यात आले.
मुख्य आरोपी मो. समिर शौकत खान वय 23 वर्षे, सोने गाळणारा साथिदार नामे सद्दाम नियामतअली शेख उर्फ बंगाली, वय 22 वर्षे यांस अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून
1) एकुण 20 तोळे सोने अं.कि.रू. 8,00,000/-
2) एक एफ.झेड कंपनीची मो/सा. अं.कि.रू. 1,00,000/-
3) एक स्कोडा आँक्टॅव्हिया कंपनीची मो/कार. अं.कि.रू. 5,00,000/-
4) एक सॅमसंग कंपनीचा अं. 55 इंच आकाराचा एल.ई.डी. टि.व्ही. अं.कि.रू. 40,000/-
5) एक सोने वितविण्याकरीता वापरण्यात येणारी गॅस नोझल असलेली गॅस हँडगन अं.कि.रू. 1,000/-
6) घरफोडीकरीता गुन्ह्यात वापरलेली हत्यारे
एकुण किंमत अंदाजे. रू. १४,४१,०००/- मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
नमुद अटक आरोपीकडे सखोल तपास करून खार पो. ठाणेचे एकुण १३ घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणुन त्यांचेकडून मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्याकडे सखोल तपास करून अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणुन अधिक मालमत्ता हस्तगत करण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती खार पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या