Ticker

6/recent/ticker-posts

चाळीचा मनमोहक देखावा

दहा बाय दहाच्या खोलीत गणरायासाठी उभारली चाळ


मुंबई, दादासाहेब येंधे : गिरणगाव परिसरातील अनेक चाळी आजही आपले अस्तित्व राखून मोठ्या दिमाखात उभ्या आहेत. मुंबईकर आणि चाळीचे हे नाते अधोरेखित करण्यासाठी परेल येथील पराग सावंत या तरुणाने गणरायाच्या देखाव्यासाठी दहा बाय दहाच्या खोलीत गिरणगावातील एका चाळीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकारण्यासाठी त्याने लाकडाचा वापर केला असून घरातील अनेक वस्तूंचा पुरेपूर वापर केला आहे. 

हा देखावा पूर्ण करण्यासाठी त्याला त्याच्या मित्रांनीही मदत केली आहे. सदर देखावा पूर्ण करण्यासाठी त्यांना १ महिन्याचा कालावधी लागला आहे.







टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या