कोरोना योद्ध्यांचा सत्कार - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

demo-image

कोरोना योद्ध्यांचा सत्कार

चिंतामणी मंडपात कोरोना योध्यांचा सन्मान 


मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने यंदाचे वर्ष "जनआरोग्य वर्ष" साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी काम करतांना जीवावर उदार होऊन रुग्णांची सेवा करणारे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी "कोवीड योद्धा कृतज्ञता सन्मान सोहळा" आयोजित केला होता.

कोरोनाच्या महासंकटाशी मुकाबला करणार्या योद्ध्यांना मंडळातर्फे प्रमाणपत्र, शाल-पुष्पगुच्छ व श्री गणेशाची मुर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

तदप्रसंगी माजी शिक्षणमंत्री  श्री.आशिष जी शेलार यांनिही  या कोविड योध्याना लढण्याची ताकद आणि शाबासकीची थाप दिली. या महामारी मध्ये  मंडळाने केलेले हे समाजोपयोगी  कार्य  आणि चिंतामणी चरणी माझी सेवा ही  अखंड आणि अविरत चालू राहो असे त्यांनी उद्गार काढले. ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष माननीय सत्यवान नर यांच्याहस्ते देखील पुरस्कार वाटप करण्यात आले.

चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. उमेश नाईक, मानद सचिव श्री. वासुदेव सावंत,  श्री.आजगावकर, श्री. विकास सावंत, श्री. विद्याधर घाडी, भालेश परब आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, चिंतामणी भक्तांनी  हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.

IMG-20200828-WA0018



IMG-20200827-WA0030



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *