मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत एका विदेशी महिलेचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीला बिहारमधून ताब्यात घेण्यात आले आहे. धोबीघाट परिसरात परदेशी महिला पर्यटक आणि कंटेंट क्रिएटरची छेड काढल्याची घटना समोर आली होती. आयनस फारिया (वय अंदाजे २८) ही पोर्तुगालची कंटेंट क्रिएटर भारत फिरण्यासाठी मुंबईत आली असताना २२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास तिच्यासोबत हा प्रकार घडला होता.
एका विदेशी महिलेने तिच्या इन्स्टाग्राम आयडीवरून एक व्हिडीओ प्रसारित केला होता, ज्यामध्ये दोन अनोळखी इसम तिचा पाठलाग करून छेडछाड करत असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आग्रीपाडा पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तातडीने महिलेशी संपर्क साधला असता, ही घटना २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास महालक्ष्मी रेल्वे स्थानक, धोबी घाट आणि सातरस्ता परिसरात घडल्याचे समोर आले.
0 टिप्पण्या