मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-४ कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. कलाम मोहम्मद अली शेख, (वय, ४६) आणि सैदुल सुकुर शेख, (वय,३७) अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत.

कलाम शेख याला ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली असून तो सीजीएस कॉलनी सेक्टर-३ वडाळा ईस्ट येथे राहत असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. सैदुल सुकुर शेख, मागील अनेक वर्षांपासून मुंबईत मजुरीचे कामे करत असून त्याला वडाळा टी टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे. हा वडाळ्याच्या लोढा जंक्शन न्यू कफ परेड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तो गोवंडी परिसरात राहत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

दहशतवाद विरोधी पथकातील तपास अधिकाऱ्याने दोन्हीही बांगलादेशी नागरिकांकडे भारतात प्रवेश करण्यासाठी वापरलेले अधिकृत कागदपत्रे मागितले असता त्यांच्याकडे तसे कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींच्या विरोधात वडाळा टीटी आणि ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात घुसखोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती,पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-०४, रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सायन विभाग, शैलेंद्र धिवार, रमेश जाधव वरीष्ठ पोलीस निरीक्षण (वडाळा टी.टी. पोलीस ठाणे), सुधाकर ढाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, (ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी वडाळा टी टी पोलीस ठाणे दहशतवादी पथक व ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे दहशतवादी पथक यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा