मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या ३४ व्या रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास स्थानिक शिवसेना नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. तसेच कल्पतरू समूह म्हणजे आपलं हक्काचं मंडळ असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच नगरसेवक रोहिदास लोखंडे यांनीही मंडळाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
वार्प इंजियनरिंग या कंपनीचे प्रभूदास गोला यांनी ३४ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखल्याबद्दल कल्पतरू समूहाला शुभेच्छा दिल्या. नायर रुग्णालयाचे रक्तपेढीचे समाजविकास अधिकारी यांनी मंडळाला संबोधताना म्हटले की, कल्पतरू समूह हे मंडळ गेली ३४ वर्षे सतत रक्तदान शिबिर राबवून मोठी देशसेवा करत आहे.
सदर रक्तदान शिबिरास डॉक्टर कम्पाउंड मित्र मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळ आदी सामाजिक संस्था यांनी हजेरी लावली.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, अविरात, महेश नानचे, स्वप्नील, वैष्णवी, अमेय परब, श्री. बाळा परब, विकास सक्रे, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, नंदू साळसकर, आदित्य देसाई, विनायक येंधे, मिलिंद चाळके, स्वराज पाटील, शिवराम पाटकर, अनंता विचारे, चारुदत्त लाड, समीर नाईक, नंदू मोरये, आनंदा पाटील, भिकाजी नानचे मास्तर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
0 टिप्पण्या