मुंबई, (दादासाहेब येंधे ) : बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोन हिच्या घरी चोरीची घटना समोर आली आहे. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली असून समीर अन्सारी (वय, ३७) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्या चोराने दागिने, अमेरिकन डॉलर आणि कॅश लंपास केली. याप्रकरणी खार पोलिसांनी वेगवान कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मुंबईच्या खार येथील पूनम ढिल्लोन हिच्या घरातून सुमारे एक लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा नेकलेस, ३५,००० रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरल्याप्रकरणी खार पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूनमच्या घरात पेंटिंगचे काम सुरू होते. २८ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत ही व्यक्ती या फ्लॅटमध्ये रंगकाम करत होती. दरम्यान, आरोपींनी संधीचा फायदा घेत कपाट उघडे पाहून तेथून मौल्यवान वस्तू चोरल्या. पूनम ढिल्लोन ही जुहू येथे राहते. त्यांचा मुलगा अनमोल हा खार येथील एका घरात राहतो. कधीकधी ती तिच्या मुलाच्या घरी राहते. आरोपींनी पूनमच्या घरातून चोरीला गेलेली काही रक्कम पार्टीत खर्च केल्याचे समोर आले आहे. पूनमचा मुलगा अनमोल दुबईहून परतला तेव्हा त्याला काही वस्तू गहाळ दिसल्या. अनमोलने तत्काळ पोलिसांत तक्रार केली आणि त्यानंतर अन्सारी याने घरावर दरोडा टाकल्याचे प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांनी समीर अन्सारी यांच्याकडून एक लाख रुपये किंमतीचे कानातील हिरेजडित टॉप आणि २६ हजारांची रोख रक्कम व अमेरिकन चलनातील ५०० यु.एस. डॉलर हस्तगत केले आहेत. मित्रांना पार्टी देण्यासाठी त्याने ही चोरी केली असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा