Ticker

6/recent/ticker-posts

सायबर हेल्पलाइनमुळे पोलीसांनी वाचवले १.३१ कोटी रुपये

सायबर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी


मुंबई, दादासाहेब येंधे : सायबर हेल्पलाईनमुळे मुंबईतील नागरिकांचे २४ तासांत १ कोटी ३१ लाख ३३ हजार १२८ रुपये वाचवण्यात पश्चिम सायबर सेल पोलिसांना यश आले. गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील नागरीकांची सायबर गुन्ह्यामध्ये फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखेअंतर्गत १९३० हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

२८ नोव्हेंबर रोजी सायबर फसवणुक झालेल्या वेगवेगळया तक्रारदारांनी फसवणुक झाल्यानंतर १९३० हेल्पलाईनला संपर्क केला होता. हेल्पलाईनमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ माहिती घेऊन तात्काळ संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करत रक्कम गोठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, मरीन लाईन्स मुंबई येथे खाजगी कंपनीमध्ये आर्थिक व्यवहार पाहणारे तक्रारदार यांना त्यांच्या मालकाचे नाव हे बनावट व्हाट्सअप द्वारे प्रोफाइल तयार करून कंपनीच्या कामकाजासाठी त्यांना ८५ लाखांचे ट्रांजेक्शन करण्यास भाग पाडले होते. तसेच इतर प्रकरणात गुन्ह्यांमधील नागरिकांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी एक कोटी ३१ लाख ३३ हजार १२८ रुपये असे विविध बँकेत रक्कम गोठविण्यात पोलीसांना यश आले आहे. तसेच, नागरिकांनीही सायबर फसवणुकीची शिकार झाल्यास तात्काळ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या