मुंबई: वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे नायक सदानंद वसंत दाते यांनी शनिवारी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. अलीकडेपर्यंत ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख होते, परंतु राज्य सरकारच्या विनंतीवरून त्यांना त्यांच्या मूळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले. १९९० च्या बॅचचे अधिकारी असलेले दाते यांची ३१ डिसेंबर रोजी पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
शनिवारी निवृत्त झालेल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून राज्य पोलीस मुख्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला.

0 टिप्पण्या