मुंबई, दादासाहेब येंधे : घाटकोपर पूर्व येथील रायझिंग सिटी परिसरात एका विवाहितेची हत्येची घटना २५ डिसेंबर रोजी घडली होती. अमिना बी सिद्दिकी असं मयत महिलेचे नाव असून ४१ वर्षीय अमिना सिद्दिकी या रात्री वॉकिंग करण्यास गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह झुडपात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली होती. अखेर पाचव्या दिवशी उत्कृष्ट तपास करीत पंतनगर पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणी मोहम्मद इरफान उर्फ चांद फकरेआलम अंसारी या आरोपीला अटक केली आहे.

आरोपी मोहम्मद इरफान अन्सारी याच्या पतीने मयत महिलेला ३ लाख रूपये कर्ज दिलं होतं. मात्र ते परत न केल्याचा राग मनात धरून आरोपीने तिची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. दिनांक २४ डिसेंबर रोजी रात्री मयत महिला ही रायझिंग सीटी परिसरात वॉकिंग करीता गेली होती. पण, बराच वेळ झाला नाही. ती परत घरी आली नाही. त्यामुळे मयत महिलेचा सर्वत्र शोध घेतला. पण, ती कुठेही मिळून आली नाही म्हणून मृत महिलेच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पंतनगर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाल्यानंतर महिलेचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी सकाळी २५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास केटी ९ समोरील झुडुपात सदर महिलेचा मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपाआयुक्त, परिमंडळ ७ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ पोलीस तपास पथके तयार करण्यात आली होती. सदर पथकांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, मोबाईल फोनसंदर्भात तांत्रिक तपास केला, साक्षीदारांकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली, संबंधितांचे पूर्व इतिहास पडताळणी, आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली आणि इतर आवश्यक तपास केला. त्यानंतर पोलिसांनी २९ डिसेंबरला आरोपी मोहम्मद इरफान अन्सारीला अटक केली. पोलिसांनी त्याला कायद्याची भाषा समजवताच त्याने खुनाची कबुली दिली. मयत महिला हिने आरोपीच्या पत्नीकडून घेतलेले पैसे परत दिले नाहीत. या गोष्टीचा राग मनात धरून त्या महिलेवर पाळत ठेवून खून केल्याचं उघड झाले आहे.
0 टिप्पण्या