Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई पोलिसांनी सुरू केले 'ऑपरेशन मुस्कान १३'

१८ वर्षांवरील हरवलेल्या महिलांकरिता विशेष शोधमोहीम

मुंबई, दादासाहेब येंधे : शहरामधून गेल्या काही महिन्यांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे आणि तरुण-तरुणींचे अपहरण झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच हरवलेल्यांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढली आहे.

त्यामुळे मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान १३’ ही शोध मोहिम आणि १८ वर्षांवरील महिलांना शोधण्यासाठी विशेष शोध मोहिमेचे आयोजन केले आहे. नागरिकांनी सुद्धा या शोध मोहमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.


मुंबई पोलिसांच्या माध्यामातून राबवण्यात येणारी ही विशेष शोध मोहिम १ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत पार पडणार आहे. या कालावधीमध्ये मुंबई शहरातून हरवलेली अल्पवयीन मुले आणि १८ वर्षांवरील महिलांना शोधण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार आहेत. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी मुंबईमधील नागरिकांनी पोलीस/बालकांसंदर्भात काम करणाऱ्या विविध अशासकीय संस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेण्यास मदत होईल. आपल्या परिसरामध्ये संशयास्पद लहान बालके सापडली किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास माहिती संबंधीत विभागांना देवून सदरचा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


संशयीत अल्पवयीन मुले सापडल्यास त्यांच्याकडे चौकशी करावी व काही संशयीत वाटल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास १०० किंवा १०९८ या क्रमांकावर कळवावे किंवा लगतच्या पोलीस ठाण्यासी संपर्क साधावा. तसेच सदर बालकास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जावे. १ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भिक मागणारे अथवा कचरा गोळा करणारी लहान मुले/मुली, धार्मिकस्थळे, रुगणालये, हॉटेल्स, दुकाने, आपण राहत असलेल्या परिसरात, नातेवाईकांकडे कोणीही संशायस्पद आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाश १०० किंवा १०९८ या क्रमांकावर कळवावे किंवा लगतच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. त्याच बरोबर एखादा अल्पवयीन मुलगा/मुलगी संशयीत वाटल्यास त्याबाबत https://missionvatsalya.wcd.gov.in या बेवसाईटवर भेट देऊन khoya paaya या पोर्टलवर पीडितांचे फोटो अपलोड करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या