३ महिलांसह ९ जणांना अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत कारवाई दरम्यान पायधुनी पोलिसांनी मुंबईतून ३६ कोटी ७२ लाख किमतीचा ‘हेरॉईन’ हा अमली पदार्थ जप्त केला असून ३ महिलांसह ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
जलाराम नटवर ठक्कर (३७), वसीम मजरुद्दीन सय्यद (२७), रुबीना मोहम्मद सय्यद खान (३०), शबनम शेख, मुस्कान समरूल शेख (१९), नवाजीस गालीब खान, सारिक मोहम्मद सलीम सलमानी, समद गालीब खान, मेहरबान अली असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज माफियांची नावे आहे. पायधुनी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलिम खान आणि पथकाने १६ डिसेंबर रोजी पी. डीमेलो रोड, मस्जिद बंदर येथून जलाराम आणि वसीम या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ३२६.२२ ग्रॅम हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा एनडीपीएस कायदा कलम ८ (क) सह २१ (क), २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली.
गुन्ह्यातील अटक आरोपींकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांच्याकडे सापडलेला हेरॉईन अमली पदार्थ हा त्यांनी कोठून आणला याबाबत तपास करून गुन्ह्यातील रुबीना मोहम्मद सय्यद खान हिचा शोध घेऊन अटक करण्यात आली. रुबिनाकडे करण्यात आलेल्या चौकशीत जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ हा शबनम शेख या महिलेचा असल्याचे निष्पन्न झाल्याने फरार झालेल्या शबनम शेख हिचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन तिला अजमेर, राजस्थान येथून तिचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. अटक दोन इसम व दोन महिलांनी विक्री करण्याच्या उद्देशाने मागविलेला हेरॉईन अमली पदार्थ पुढे कोणाकडून आणला याबाबत तसेच अमली पदार्थ विक्री अगर बनविणारे रॅकेट सदर गुन्ह्यात निष्पन्न होण्याची शक्यता असल्याने त्याअनुषंगाने गुन्ह्यातील आरोपीतांकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या पुढील साखळीबाबत सखोल तपास केला असता, शबनम शेख हिला माल पुरविणारी महिला मुस्कान समरूल शेख ही देखील गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असल्याने तिचा देखील तांत्रिक माहितीद्वारे तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध घेऊन तिला मस्जिद बंदर परिसरातून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या मुस्कान समरूल शेख कडे कसोशिने तपास करून सदरचा माल त्यांना पुरविणारे पुढील साखळीबाबत कौशल्यपुर्ण तपास करून मुस्कान शेख हिला अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या इसमाबाबत तिच्याकडून माहिती घेऊन मेहरबान अली हा तिला नेहमी माल पुरवित असून, तो २४ डिसेंम्बर रोजी माल देण्याकरीता येणार असल्याची खबर प्राप्त करून मस्जिद बंदर परिसरात सापळा लावून मुस्कान हिला माल देण्याकरीता आलेला अब्दुल कादिर शेख याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत मेहरबान अली याने माल घेऊन पाठविले असल्याचे समोर आले. दरम्यान अब्दुल कादिर शेख याच्या अंगझडती त्याचे ताब्यातून १ कोटी ३८ लाख रुपये एवढ्या किंमतीचा हेरॉईन अमली पदार्थ हस्तगत करण्यात पथकास यश आले. या गुन्ह्याच्या तपासात अमली पदार्थ पुरविणाऱ्यांची साखळी मिळून येत असल्याने अमली पदार्थ पुरविणारा मुख्य आरोपी मेहरबान अली याचा शोध घेण्याकरीता पथक तयार करून अटक आरोपी अब्दुल कादर शेख यांस हेरॉईन पुरवठा करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता ते आनंद नगर, ओशिवरा, याठिकाणी असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्याठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता, एका खोलीत नवाजीस गालीब खान, सारिक मोहम्मद सलीम सलमानी, समद गालीब खान हे तिघे हे हेरॉईन हा अमली पदार्थांच्या कागदी पुड्या पॅक करत असताना सापडले.
पोलीस पथकाने त्या खोलीतून ३३ कोटी, ८६ लाख ७६ हजार, एवढ्या रक्कमेचा हेरॉईन अमली पदार्थ (Drugs Seized) हस्तगत करण्यात पायधुनी पोलीस ठाणेच्या पथकास यश प्राप्त झाले आहे. या गुन्ह्यात पायधुनी पोलिसांनी केलेल्या तपासात ६ पुरुष व ३ महिला असे एकूण ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून ८ किलो ८३२ ग्रम वजनाचा ३६ करोड, ५५ लाख, २५ हजार हेरॉईन अमली पदार्थ व रोख रक्कम ८,२६,८०० व १० लाख किमतींचे मोटर कार व १,४०,५०० किंमतीचे १२ मोबाईल असा एकूण ३६ कोटी, ७२ लाख, ५६ हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ विजयकांत सागर (अति. कार्यभार), सहाय्यक पोलीस रेणूका बूवा, पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायधुनी पोलीस ठाणे विनोद गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), अभिजीत शिंदे, पो. नि. सलीम खान, पो. उ. नि सचिन लहामगे, अनिल वायाळ, पो. ह. खान, निकम, शेंडे, ठाकूर, पो. शि. घोडे, वाक्से, पाडवी, अलदर, इतापे, अक्षय पाटील आणि जगदेव आदी पथकाने पार पाडली.
0 टिप्पण्या