Ticker

6/recent/ticker-posts

२६/११, मुंबईवरील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्यांना वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दादासाहेब येंधे : २६ नोव्हेंबर… अर्थात २६/११ चा दहशतवादी हल्ला कुणीही विसरू शकत नाही. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी या दिवशी पुन्हा समोर येतातच. थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला तब्बल १६ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सीएसएमटी रेल्वे टर्मिनस मेन लाईन येथील स्टेशन मास्टर कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शहीद स्मृतिस्तंभ येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. 

२६/११/ २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार, भारतीय सैन्याचे अधिकारी, जवान व रेल्वे प्रवासी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याकरिता व श्रद्धांजली वाहण्याकरिता सीएसएमटी रेल्वे टर्मिनस मेन लाईन येथील स्टेशन मास्टर कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शहीद स्मृतिस्तंभ येथे मा.डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, श्री. सुधाकर शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त सीएसएमटी विभाग, श्री. राजेंद्र रानमळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन/गुन्हे, लोहमार्ग मुंबई, श्री.किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, बांद्रा विभाग,श्री. प्रवीण वायकर, स्टेशन प्रबंधक, सीएसएमटी रेल्वे स्टेशन यांनी पुष्प चक्र अर्पण करून शहिदांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. सदर वेळी घाटकोपर मुख्यालय येथील बँड पथक यांनी शहीद धून बाजवून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच घाटकोपर मुख्यालय येथील राखीव पोलीस निरीक्षक श्री.खेडकर यांनी सन्मान परेड घेऊन, शहीद स्तंभास सलामी दिली व अभिवादन केले.

प्रसंगी श्री. भगवान ईप्पर, प्रभारी निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, लोकल लाईन, श्री पी. बी.सिंग, प्रभारी निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, मेन लाईन  तसेच रेल्वे चे विविध अधिकारी, मान्यवर, युनियनचे पदाधिकारी कार्यकर्ते व रेल्वे प्रवासी हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे घाटकोपर मुख्यालयातील श्वान पथक व BDDS पथक, रेल्वे सुरक्षा बल यांचे श्वान पथक हे देखील उपस्थित होते. 


यावेळी मोठया प्रमाणात रेल्वे प्रवासी व नागरिकांनी शहिदस्तंभास अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. अशी माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या