मुंबई, दादासाहेब येंधे : रंगारी बदक चाळ काळाचौकी येथील नवबालक क्रीडा मंडळातर्फे नुकताच १४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि १७ नोव्हेंबर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनानिमित्त २४ नोव्हेंबर २०२४ रोजी बालकदिन साजरा करण्यात आला. मंडळाचे प्रमुख विश्वस्त अनिल हेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रंगारी बदक चाळीच्या पटांगणात बालकदिन यावर्षी जल्लोषात साजरा करण्यात आला.

मंडळातर्फे दरवर्षी गल्लीतील चालू शैक्षणिक वर्षात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलन क्षमतेची परीक्षा घेऊन त्यांना सुरत्न नवबालक पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी मंथन पेडणेकर यास २०२४ चा सुरत्न नवबालक पुरस्कार देण्यात आला.

प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मंगेश पिंपळकर, मंगेश सकपाळ, प्रसाद सावंत, अशोक भास्कर, योगेश राणे तसेच संतोष सकपाळ आदी आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सोहळ्यात मुलांनी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाची सांगता मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आला.



0 टिप्पण्या