अवघ्या काही तासांत पोलिसांनी वस्तू शोधल्या
मुंबई (दादासाहेब येंधे) : काळाचौकी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी बाजावली आहे. बेल्जियम देशात राहणाऱ्या एका परदेशी नागरिकाचे हरविलेले जॅकेट पोलीसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढत त्यास परत मिळवून दिले आहे.या परदेशी नागरिकाने एका पत्राद्वारे काळाचौकी पोलिसांचे आभार मानले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,(१४ नोव्हेंबर) रोजी काळाचौकी पोलीस ठाणे हददीत रात्रपाळी कर्तव्य बजावत असताना पोलिसांकडे मध्यरात्रीच्या दरम्यान बेल्जियम या देशाचे नागरिक विल्यम जुमेट हे आले. ते मुंबई एअरपोर्ट वरून ते सद्या राहत असलेल्या हॉटलकडे परत येत असताना त्यांच्याजवळील काळ्या रंगाचा कोट, त्यात त्यांचे पासपोर्ट, ओपो कंपनीचा मोबाईल फोन, तसेच त्यांच्याकडे त्यांच्या देशाचे व भारतीय चलन किंमत अंदाजे ५० हजार रुपये असा मुद्देमाल काळ्या रंगाच्या कोटमधे ते कुठेतरी विसरल्यामुळे त्यांना सापडत नसल्याने पोलीस ठाणेत येऊन त्यांनी तक्रार दाखल केली.
काळाचौकी पोलिस स्टेशन येथे रात्रपाळी ठाणे अंमलदार कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी इंगळे यांनी बेल्जियम या देशाचे नागरिक असलेल्या विल्यम जुमेट यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली. विल्यम जुमेट यांच्या हरवलेल्या वस्तु व रक्कमचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलाणी व पथकाच्या मदतीने क्षणाचाही विलंब न करता विल्यम जूमेट यांच्या हस्वलेल्या वस्तुंचा शोध सुरू केला. त्यांनी केलेल्या प्रवासाची सविस्तर माहिती घेऊन विल्यम जुमेट यांनी प्रवासाकरीता वापरलेल्या टॅक्सीचा एअरपोर्ट परीसरात तसेच त्यांच्या प्रवासाचा मार्गावर शोध घेतला असता टॅक्सी क्रमांक प्राप्त करून टॅक्सी चालकाचा मोबाईल क्रमांक मिळवून अतिशय कमी कालावधीत तक्रारदार यांचे प्रवासात हरवलेल्या सर्व वस्तु व रक्कम महिला पोलीस उपनिरीक्षक. इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलानी व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी उत्कष्टपणे तपास करून तक्रारदार यांना तात्काळ परत मिळवून दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा