मुंबई, दादासाहेब येंधे : भारतीयांची ऑनलाइन पध्दतीने आर्थिक फसवणूक करणाऱ्या परदेशी सायबर माफियांना मोबाईल कंपन्यांच्या कर्मचाऱ्याकडूनच पाठबळ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे.

परदेशी सायबर ठाकसेनांना बेकायदेशीररित्या मोबाईल सिमचा पुरवठा करणाऱ्या दोन मोबाईल कंपन्यांच्या ५ कर्मचाऱ्यासह ८ जणांना मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या कर्मचाऱ्यांनी दुकानदारांच्या मदतीने मागील एक वर्षात ३० हजार सिम कार्ड बेकायदेशीररीत्या पुरवल्याची धक्कादायक पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या टोळीने काही कमिशनपोटी हे कृत्य केल्याचे समोर आले असून या टोळीकडून सिम कार्ड खरेदी करणाऱ्याची माहिती काढली जात आहे.
शेअर्स ट्रेडिग सायबर फसवणूक प्रकरणी मुंबई सायबर मध्य पोलीस ठाण्यात ५१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली होती, या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडून तपास सुरू असताना सायबर माफियांनी तक्रारदाराला ‘एमएफएसएल स्टॉक चार्ट ३३’ या व्हॉटसअँप ग्रुपमध्ये ऍड करून शेअर्स ट्रेडींग करण्यासाठी पैसे गुंतवणुक करण्याकरीता त्यांचे ब्रोकरेज कंपनीच्या व्हर्क्युअल पेजवर खाते तयार करून त्यात व्हर्क्युअल नफा जमा होत असल्याचे दाखवुन त्यांना विविध बँक खात्यांमध्ये ५१,३६,००० हजार रुपये रक्कम भरण्यास भाग पाडले होते.
सायबर पोलीस ठाण्याच्या तपासात व्हाट्सअप्प ग्रुप मधील मोबाईल क्रमांक तपासले असता या मोबाईलचे सिम घेण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नव्हती, केवळ यूपीसी कोडच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक पोर्ट करून त्यांची विक्री करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी हे मोबाईल सिम कुठून विकले गेले याची माहिती मिळवून तीन दुकानदाराना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता दोन वेगवेगवेगळ्या मोबाईल कंपनीच्या कर्मचारी यांनी हे सिम बेकायदेशीररित्या पोर्ट करून दिल्याचे तपासात समोर आले. दरम्यान सायबर पोलिसांनी दोन्ही मोबाईल कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यासह दुकानदार असे आठ जणांना अटक केली आहे.मागील वर्षाभारत या टोळीने ३० हजार मोबाईल सिम बेकायदेशीररित्या परदेशी नागरिक आणि फसवणूक करणार्यांना विकल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी सायबर पोलिसांनी महेश महादेव कदम, रोहित कन्हैयालाल यादव, सागर पांडुरंग ठाकूर, राज रविनाथ आर्ड , गुलाबचंद कन्हैया जैस्वार, उस्मान अली मो हेजाबुर रहमान शेख, अब्बुबकर सिद्दिकी युसुफ, आणि महेश चंद्रकांत पवार, असे अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्यापैकी पाच जण मोबाईल कंपनीचे कर्मचारी असून इतर तिघेजण दुकानदार आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा