Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत परदेशी आणि भारतीय नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश;

गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी, १९ जणांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे :  मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींना फसवणूक करताना रंगेहाथ पकडलं असून त्यांच्याकडून १२ मोबाईल, २२ हार्ड डिस्क, १ लॅपटॉप आणि कम्प्युटर जप्त केले आहेत.  

पोलिसांनी एकाच दिवसात दोन बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे.ॲक्सेंन्टयुॲट ग्लोबल टेक्नॉलॉजीस्ट, (अंधेरी कुर्ला रोड, चकाला, जे. बी. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई) येथे एक बोगस कॉल सेंटर मिळून आले होते. त्या बेकायदेशीर कॉल सेंटर मधून परदेशी नागरीकांना बनावट नाव धारण करून ते गुगल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून त्यांचे गुगलवर असलेले बिझनेरा प्रोफाईल हे बंद होणार असून ते अपग्रेड करून देतो. त्यावर ग्रीन टिक व्हेरीफाईड करून देतो असे खोटे सांगुन परदेशी नागरिकांकडून क्रेडिट कार्डद्वारे पैसे स्विकारून त्यांना गुगलची कोणतीही सेवा न पुरवता परदेशी नागरीकांची फसवणूक करताना सापडले आहेत.
त्याचप्रमाणे कक्ष-११ यांनी कांदीवली पोलीस ठाणेच्या हद्दीत स्पॉट फिक्सिट सोल्यूशन ( कांदिवली रेल्वे स्टेशनच्या जवळ, कांदिवली पश्चिम) या दोन बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या १९ लोकांमध्ये बनावट कॉल सेंटरचा मालक आणि व्यवस्थापकाचाही समावेश आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲक्सेंन्टयुॲट ग्लोबल टेक्नॉलॉजीस्ट या कॉल सेंटरमध्ये गुगल सेवेच्या नावाखाली परदेशी भारतीय लोकांची लुट केली जात होती.त्याचप्रमाणे कक्ष-११ यांनी कांदीवली पोलीस ठाणेच्या हद्दीत स्पॉट फिक्सिट सोल्यूशन अधिकृत परवाना नसताना तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने 'फॉरेक्स ट्रेडींग' करण्यावर बंदी घातली असताना भारतीय नागरीकांना वेगवेगळया माध्यमातुन संपर्क करून त्यांना चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून 'फॉरेक्स ट्रेडींग' मध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पेमेंट गेटवेच्या माध्यमातुन पैसे स्वीकारून त्यांची कोणतीही ट्रेडींग न करता फसवणूक करताना आढळून आले आहेत.

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१० व कक्ष-११ या कक्षातील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पोलीस पथके तयार केली व एम. आय.डी.सी. पोलीस ठाणे, कांदीवली पोलीस ठाणेच्या हद्दीत सापळा रचून छापा टाकला असता पोलिसांना बनावट कॉल सेंटर पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी १९ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या कारवाई मध्ये एकुण १२ मोबाईल फोन, २२ हार्ड डिस्क, ०१ मॉनीटर, ०२ सीपीयु, ०१ राउटर, ०१ लॅपटॉप, ०१ किबोर्ड, १२ हेडफोन माईक तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज जप्त करून तेथील ०२ मालक, ०५ टिम लिडर, ०१ कॉलसेंटर सेल्स मॅनेजर, ११ ऑपरेटर व असे एकुण १९ आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.या संपूर्ण बनावट कॉल सेंटर चा तपास गुन्हे शाखा करत आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), विशाल ठाकूर,सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम), प्रशांत राजे, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-उत्तर), राजेंद्र शिरतोडे यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष-११ यांचे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक दिपक सावंत, पोलीस निरीक्षक मनोज सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, रोहित नार्वेकर, अफरोज शेख, पोलीस अंमलदार कांबळे, पोलीस हवालदार धारगळकर, माने, खरात, मोरे, चवरे, चिकणे, पोलीस शिपाई डफळे, निर्मळे, महिला पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस शिपाई झरेकर, शिंदे तसेच कक्ष-११ यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश निवतकर, पोलीस निरीक्षक काकडे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सावंत पोलीस हवालदार देशमुख, सुर्वे, केणी, खांडेकर, खताते, कदम, सावंत, महिला पोलीस हवालदार लाडे, कदम, महिला पोलीस शिपाई गोसावी, ढगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या