मुंबई, दादासाहेब येंधे : बिहार राज्याच्या जिल्हा भागलपुर मुस्तकीम इंग्लिश चिचरोन, या गावी राहणाऱ्या फिर्यादी रहूफ खान (वय ३३ रा.राज्य बिहार) यांचा छोटा भाऊ मो. आलम रहुफ खान, (वय १६) यांचे ५ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. ८ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह मिळून आला होता. याप्रकरणी अकबर नगर पोलीस ठाणे, भागलपुर, बिहार येथे कलम १४० (२),१०३,२३८,६१ (२), बी.एन.एस अन्वये अपहरण आणि खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हयाचे गांभिर्य ओळखून गुन्हयातील फरार आरोपी शाहीद राजा उर्फ राजू नसिम खान, (वय २२ रा. जिल्हा भागलपुर, राज्य बिहार) हा मुंबई येथे पळून आल्याची माहिती बिहार पोलीसांकडून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ मुंबई यांना प्राप्त झाली. माहिती मिळताच भायखळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने यांनी फरार आरोपीचा मोबाईल क्रमांक तसेच त्याचे भाऊ यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीची माहिती काढली. आरोपी हा ‘सिटी मून’ हॉटेल, सरदार वल्लभभाई पटेल रोड, डोंगरी, मुंबई या हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती प्राप्त होताच तात्काळ सर जे.जे. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथील एटीसी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे व पथक तसेच भायखळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने व पथक यांनी हॉटेलमध्ये जावून शोध घेतला असता तो तेथे मिळून आला. बिहार पोलिसांनी आरोपी तोच असल्याची खात्री करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपी यापूर्वी २०२२ मध्ये अपहरण, खून, खूनाचा कट व खूनाचा पुरावा नष्ट करणे या गुन्हयामध्ये अटक केले असल्याचे सांगितले. तसेच तपासामध्ये त्याने सध्या जामिनावर मुक्त झाल्याचे सांगितले. अकबर नगर पोलीस ठाणे, भागलपुर, बिहार येथील पोलीस उपनिरीक्षक रोहीत व पथक हे भायखळा पोलीस ठाणे येथे आले. बिहार पोलीसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता १४ नोव्हेंबर रोजी पर्यंत ट्रान्सीट रिमांड देण्यात आले आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सत्यनाराण चौधरी, पोलीस सह आयुक्त (का व सु), अनिल पारसकर, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, दत्तात्रय कांबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, शंकर चिंदरकर, सहायक पोलीस आयुक्त, आग्रीपाडा विभाग, विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भायखळा पोलीस ठाणे, जितेश शिंगोटे, पोलीस निरीक्षक गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने, पोलीस हवालदार पठारे, संजय जाधव, देशमुख, राकेश कदम, पोलीस शिपाई दिगंबर साताळकर, राजेश राठोड, राकेश जाधव, सोमनाथ जगताप, जालींदर पिचड, सोनावणे, देसाई, राजेश पाटील यांनी केली आहे.
0 टिप्पण्या