धुळ्याच्या शेतात गांजाची नशा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

demo-image

धुळ्याच्या शेतात गांजाची नशा

दोन एकरात उगवलेला साडेपाच कोटींचा गांजा जप्त


मुंबई, दादासाहेब येंधे : धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील एका खेड्यात २ एकर जमीनीवर गांजाची शेती पिकवली जात असल्याची धक्कादायक बाब मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईतून समोर आले आहे.
2747.pdf-image-004

धुळे जिह्यातील मौजे भोईटे शिवारात सव्वादोन एकरांत गांजाची शेती फुलविण्यात आली होती. हा गांजा नशेबाजांना पुरविला जात होता. पण या गांजाच्या शेतीची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने त्या शेतात जाऊन तब्बल दोन हजार ८१६.५ किलो गांजाचा साठा जप्त केला.ही शेती करणारा मात्र फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटचे वरिष्ठ निरीक्षक जीवन खरात, प्रभारी निरीक्षक राजेंद्र दहिफळे व पथकाने ऑगस्ट महिन्यात साकीनाका येथे एका तस्कराला गांजा विकण्यासाठी आला असता रंगेहाथ पकडले होते. तेव्हा त्याच्याजवळ ४७ किलो गांजा सापडला होता. त्या तस्कराकडे चौकशीत त्याने धुळ्यात राहणारा किरण कोळी याच्याकडून घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आणखी खोलात जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता किरण कोळी याने शिरपूर तालुक्यातील मौजे भोईटे शिवारात सव्वा एकरामध्ये गांजाची शेती केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खरात व त्यांच्या पथकाने त्या शेतात धडक देऊन दोन हजार ७७४ किलो वजनाची गांजाची वनस्पती, ४२.५ किलो वजनाचा सुका गांजा असा तब्बल पाच कोटी ८६ लाख किमतीचा दोन हजार ८१६.५ किलो वजनाचा गांजा जप्त केला. पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त केली. 
2747.pdf-image-003

शिरपुर, जि. धुळे येथे सव्वा दोन एकर शेतीमध्ये लागवड केलेला 'गांजा' मिळुन आला आहे. एकुण २७७४ किलो वजनाची गांजा या वनस्पतीची झाडे व ४२.५ किलो वजनाचा ओलसर / सुका गांजा असा एकुन 2816.5 किलो वजनाचा कि.अं. ५.३६ कोटी किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असुन गांजा शेतीची लागवड करणारा पाहिजे आरोपीचा शोध चालु आहे.अंमली पदार्थ विरोधी कक्षाने यांनी धडक कारवाई करत भोईटी, (ता. शिरपुर, जिल्हा धुळे) येथे 'गांजा' ची लागवड केलेली शेती शोधुन त्यावर कारवाई करुन सदरवेळी एकूण २८१६.५ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ एकूण अं. किं. रू. ५.३६ कोटी पेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

कारवाई करणारे पोलीस पथक

विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा, मुंबई, सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, बांद्रा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिवन खरात यांचे नेतृत्वाखाली, प्रकटीकरण पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, पोलीस निरीक्षक नितीन केराम, सुरेश भोये, रविंद्र मांजरे, सपोनि, श्रीकांत कारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, फाळके व स्टाफ या पथकाने केली आहे.

%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%202747_1%20(1)

%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%202747_2


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *