मुंबई, दादासाहेब येंधे : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिमंडळ-६ कार्यक्षेत्रातील ५३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील परिमंडळ-६ कार्यक्षेत्रात चेंबूर, गोवंडी, नेहरूनगर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, मानखुर्द,आरसीएफ, देवनार, शिवाजीनगर, टिळकनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे
विधानसभा निवडणुक शांततामय व सुरक्षित वातावरणात पार पाडण्याकरीता परिमंडळ-६ अंतर्गत येणा-या पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे पोलीस ठाणे अभिलेखावरीत आरोपीतांचा हद्दपारीचा प्रस्ताव परिमंडळ-६ कार्यालयास सादर केला असता, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-६, मुंबई यांनी सुनावणीअंती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये चेंबूर पोलीस ठाणेमधील रितेश प्रभाकर भारसाखळे उर्फ रित्या, मोहम्मद फरीद आलीम शेख, मानखुर्द पोलीस ठाणेमधील मोहम्मद दाजीम मलावर शेख, साबीअली इसरार अहमद शेख, आरसीएफ पोलीस ठाणेमधील मुक्तार अब्दुल रशिद शेख, शफिक उर्फ अंजी मोहम्मद अली शेख, मनिष उर्फ मन्या शंकर चौधरी, तौफिक मो. अली शेख, विशाल सत्यजित रहिये, सलमान मोहदिया खान, रफिक मोहम्मद अली शेख, शुभम जॉन नाडर, सनी बुध्दी परिहार, टिळकनगर पोलीस ठाणेचे शफिक अहमद अब्दुल अजिम मन्सुरी, आसिफ अब्दुल शेख, मोहम्मद उमर सयदअली खान, अतिकुर रहमान इरफान चौधरी या टोळी प्रमुख व टोळी सदस्य अशा १७ आरोपींना हद्दपार केले.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा