दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि लाखोंच्या गांजासह दोघेजण गजाआड - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

demo-image

दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि लाखोंच्या गांजासह दोघेजण गजाआड

मुंबई : राज्यात निवडणूकीची घाई सुरू असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष-७ शाखेने दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि लाखोंच्या गांजासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. इग्रान यासीन खान इनामदार उर्फ लोच्या(४१) आणि निलेश रामचंद्र बने(३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हे कक्ष-७ ला भांडुपमध्ये इग्रान नावाच्या व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. 

IMG-20241021-WA0037

पथकाने या ठिकाणी धाड टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक काडतूस ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत निलेश बने नावाच्या आरोपीकडेही पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे धाड टाकली असता त्याच्याकडून १ पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे आणि ३८.७ किलो गांजा असे असा तब्बल १६ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

66-2024,%20Sec%203,25%20Arms%20-%20Press%20Note_1            
66-2024,%20Sec%203,25%20Arms%20-%20Press%20Note_2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *