मुंबई, दादासाहेब येंधे : कफ परेड परिसरातील मेकर टॉवर येथे मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी करुन विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीतील चार जणांना कफ परेड पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आली आहे.
.jpg)
कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकर टॉवरजवळ सोमवारी मांडूळ प्रजातीच्या सापाची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती कफ परेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने मेकर टॉवर परिसरात सापळा रचला होता. प्राप्त माहितीनुसार एका चारचाकी वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या पाठीमागील बाजूस ठेवलेल्या एका बॅगची तपासणी करताना त्यात ५ किलो वजनाचा व ५५ इंच लांबीचा मांडूळ साप आढळून आला. सापाला ‘आरे की फाउंडेशन’चे सर्पमित्र गणेश गायकवाड यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या