डिलिव्हरी बॉय, पण, काम दुचाकी चोरी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

डिलिव्हरी बॉय, पण, काम दुचाकी चोरी

कल्याण, दादासाहेब येंधे : एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना कल्याण शहरात मोटारसायकल चोरी करण्याचे काम एका तरुणांकडून बऱ्याच दिवसांपासून सुरु होते. दरम्यान एक दुचाकी चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाल्यामुळे तो चोरटा पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन दुचाकी व एक रिक्षा हस्तगत केली आहे.

कल्याणच महात्मा फुले पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. कुणाल साबळे असे या चोरट्याचे नाव असून कुणाल हा एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करीत होता. मात्र, त्याचा खरा धंदा गाडी चोरण्याचा होता. गणेशोत्सव दरम्यान पोलीस बंदोबस्तात असल्याची संधी साधत कुणालने दुचाकी, रिक्षा चोरण्याचा सपाटा लावला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असता पोलिसांकडून तपास सुरु होता.


दरम्यान या तपासादरम्यान कल्याण पश्चिमेतील एका नामांकित हॉटेल समोर पार्क केलेली मोटारसायकल चोरी करीत असतानाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आणि कुणाल पोलिसांच्या अलगद सापळ्यात अडकला. कल्याण पूर्व येथील चक्की नाका परिसरात राहणारा कुणाल याने याआधीदेखील दुचाकी चोरी केल्याचा संशय पोलिसाना असून महात्मा फुले पोलीस अधिक करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot