ठाणे लोहमार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी, चेन चोर महिलेस अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

ठाणे लोहमार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी, चेन चोर महिलेस अटक

१२ चैन चोरी व १ जबरी गुन्हा उघडकीस


ठाणे, दादासाहेब येंधे :  ठाणे रेल्वे पोलीस ठाणे कडील गु.र.नं.८१२/२०२४ कलम ३७९ भा द वि गुन्ह्यातील महिला आरोपीची गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून महिला आरोपी  सरोजा नागनाथ भालेराव हिस ताब्यात घेऊन सखोल तपास करून ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील १२ चैन चोरीचे व १ गुन्हा जबरी चोरीचा व अजून एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. एकूण १३ गुन्हे  उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत केले व अजून काही गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न करत आहोत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तक्रारदार सोनाली घोरपडे या दि. १० जून रोजी रात्री ८ वाजता फलाट क्र.०२ वर आलेल्या कल्याण स्लो लोकल गाडीत मधले महिलांचे राखीव डब्यात महिलांच्या गर्दीत चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कशाला तरी अडकून तुटून काही भाग त्यांचे टॉप वर अडकलेला मिळून आला व उर्वरित चैनीचा भाग कोणीतरी अज्ञात महिलेने चोरून या बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तक्रार दाखल होताच पोलिसांनी सापळा रचून सरोजा नागनाथ भालेराव हिस ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता तिने गुन्हा कबूल केले. तसेच पोलिसांनी तिच्याकडून ७७.२४० ग्रॅम सोन्याच्या एकूण११ चेन व १ मंगळसूत्र जप्त केले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती अर्चना दुसाने, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील स.पो.नि.गणेश नावकार ,पो. उप निरीक्षक संजय मडव,पो. हवा ३२३३ अमोल अर्जुन, पो. हवा. २२१७ राठोड म. पो.हवा .३८३ सावंत,पो.शि.६४० नदाफ पो.शि. १७८५ गोसावी,पो.शि.७७३ गायकवाड ,पो. शि.६३४ सरवदे,पो. शि. २११ रणसिंग ,पो. शि.६४७ मोरे , यांनी सदरची कामगिरी केली आहे. अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज