सव्वाचार कोटींचा चरस, एमडीचा साठा मुंबईत हस्तगत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

सव्वाचार कोटींचा चरस, एमडीचा साठा मुंबईत हस्तगत

चार विविध करवायांमध्ये ४ तस्करांना अटक


मुंबई, दि.१ : मुंबईत चार विविध कारवायांत चार ड्रग तस्करांना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान, कांदवली आणि घाटकोपर युनिटने अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे ४५ कोटींच्या चरस आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. 

शिवडी येथे काहीजण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाकी होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवत एका तरुणास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ७ किलो ९५४ ग्राम वजनाचे चरस सापडले त्याची किंमत तीन कोटी ९८ लाख रुपये इतकी आहे. अन्य एका कारवाई त्या पथकाने माझगाव येथून एका आरोपीस अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तीन लाखांचे १५ ग्राम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. 

दहिसर येथे कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांनी एमडी ड्रग्जच्या विक्रीसाठी आणलेल्या एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ३८ ग्रॅम वजनाचे एम.डी ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत पावणेचार लाख रुपये इतकी आहे. सदर कारवाई सुरू असतानाच मानखुर्द येथून अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटच्या अधिकाऱ्यांनी अन्य एका आरोपीस ९७ ग्रॅम वजनाच्या ड्रग्जसहित अटक केली. त्याची किंमत जवळजवळ १९ लाख रुपये इतके आहे.

चारही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केल्यानंतर चौघांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम राबवत आहेत. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज