अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे रहस्य उलगडलं - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे रहस्य उलगडलं

आरोपी २४ तासांत अटक


मुंबई, दि. २६ : ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ ऑगस्टच्या दरम्यान अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह गोणीमध्ये भरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली तेव्हा महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर एक आव्हान होते. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-६ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वात १० पथके तयार करून केवळ २४ तासात मृत महिलेची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. लवकरच पोलीस संशयित आरोपींकडून या गुन्ह्याचे रहस्य उलगडणार आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय वर्तविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ ऑगस्ट सकाळच्या दरम्यान एका गोणीमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम १०३ (१), २३८ भारतीय न्याय संहिता खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ-६ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली १० पथके तयार करून मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी केवळ २४ तासात पाच संशयित आरोपींना अटक केली असून कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांकडून शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृत महिलेचा पती, दीर, नंदोई, नंदोइची आई व बहिण यांना संशयित आरोपी म्हणून अटक केली असून गुन्हा  कौटुंबिक वादातून झाल्याचे दिसून येत आहे. ट्रॉम्बे पोलिसांकडून पाचही आरोपींची चौकशी चालू आहे.


पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, सह पोलीस आयुक्त  सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई,  पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-६  मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे विभाग, राजेश बाबशेट्टी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नेहरूनगर विभाग,  शशिकांत भंडारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई  राजेश शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे, फरीद खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काटकर, केदार वायचळ, सुशील लोंढे, नवनाथ काळे दिपक दळवी, प्रशांत मोरकाने, भोसले व पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, भाउसाहेब माळवदकर, विजयसिंह देशमुख, ऋषिकेश बाबर, अजय गोल्हार, अभय काकड, अनिल बांगर, अमोल चाटे, अनिल महारनुर, गणेश कर्चे, राजू साळुंखे व पथक यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज