मुंबई, दि. २८ : घाटकोपर पूर्व परिसरातून हरवलेले आणि चोरण्यात आलेले १५१ मोबाईल फोन पंतनगर पोलिसांनी हस्तगत करत ते मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईल फोनची किंमत १५ लाख १० हजार रुपये इतकी आहे.

चोरी झालेल्या आणि हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पंतनगर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. पंतनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम ताकमोगे व सागर खोंद्रे, पोलीस हवालदार संतोष गीध आणि महिला पोलीस शिपाई रूपाली हाडवळे यांच्या पथकाने तपास करत एकूण पंधरा लाख दहा हजार रुपये किमतीचे १५१ मोबाईल फोन हस्तगत करत नागरिकांना परत केले आहेत.
Photo:google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा