एक कोटींचे हेरॉईन जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ३० मे, २०२४

demo-image

एक कोटींचे हेरॉईन जप्त

दोन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या


मुंबई, दादासाहेब येंधे : उत्तराखंडमधून मुंबईत हेरॉईन हे अमलीपदार्थ घेऊन आलेल्या दोन तस्करांना अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या (एएनसी) कांदिवली कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून पोलिसांनी एक कोटी १२ लाख रुपये किमतीचे उच्च प्रतीचे २८० ग्रॅम 'हेरॉईन' हस्तगत केले आहे.


एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील दोन तस्कर बोरिवलीमध्ये अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती कांदिवली कक्षाला मिळाली होती. त्यानुसार, प्रभारी पोलिस निरीक्षक वैभव धुमाळ यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ ८० ग्रॅम हेरॉईन सापडले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळजवळ एक कोटी १२ लाख रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.

2567

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *