फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईने केली अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, १२ मे, २०२४

demo-image

फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईने केली अटक

फसवणुकीचे ०५ गुन्हे उघड झाले बाबत 


मुंबई, दि. १२ : गुन्हयातील फिर्यादी महिला, वय ६२ वर्षे या दिनांक २२/०४/२०२४ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास साने गुरुजी मार्ग, ताडदेव, मुंबई येथून पायी चालत असताना, दोन अनोळखी पाहिजे आरोपी यांनी आपसात संगनमत करुन, फिर्यादी महिला यांना थांबवून बने कंपाउंड, ताडदेव येथे गरीब गरजु व्यक्‍तींना कपडे व पैशांचे वाटप सुरु असल्याचे खोटे सांगून, नमुद कपडे व पैसे प्राप्त करण्याकरीता गरीब दिसणे आवश्यक असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी परिधान केलेली सोन्याची चैन, बोटातील अंगठी, कानातील साखळी असे एकुण २३ ग्रॅम वजनाचे दागिने त्यांना काढण्यास भाग पाडून, ते दागिने एका पिशवीमध्ये ठेवत असल्याचे भासवून, हातचलाखीने ते दागिने घेवुन निघून गेले. थोडयावेळाने फिर्यादी यांनी पिशवीतील त्यांचे दागिने बघितले असता, ते दिसून न आल्याने नमुद इमसांनी त्यांची फसवणुक केल्याची खात्री होवून, सदरबाबत फिर्यादी यांनी ताडदेव पोलीस ठाणेस दिलेल्या तकारीवरुन गु.र.क. १६५/२०२४, कलम ४२०, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


गुन्हयाचे समांतर तपासात, गुन्हयातील दोन पाहिजे आरोपीपिकी मुख्य आरोपी नामे सुनिल सरदारसिंग शिंदे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात अशाच प्रकारच्या फसवणुकीचे १० गुन्हे नोंद असल्याचे कक्ष -३, गुन्हे शाखा, मुंबई यांना समजले. पाहिजे आरोपी याचा शोध घेता, तो अकोला, हिंगोली, परभणी इत्यादी ठिकाणी वास्तव्याच्या जागा बदलत असल्याचे समजले. नमुद आरोपी ता. वसमत, जि. हिंगोली येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने, कक्ष - ३, गुन्हे शाखा, मुंबई चे पोलीस पथक यांनी ता. वसमत जि. हिंगोली येथे जावून नमुद आरोपीचा शोध घेता, तो हिंगोली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना, चोंडी रेल्वे स्थानक येथे दिनांक १०/०५/२०२४ रोजी शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासात तो खालील गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.


१) ताडदेव पो. ठाणे मुंबई गु.र.क. १६५/२०२४, कलम ४२०, ३४ भादवि

२) शाहुनगर पोलीस ठाणे, गु.र.क. '5३/२०२४ कलम ४२०, ३४ भादवि

३) वडाळा पोलीस ठाणे, गु.र.क. ६६/२०२४ कलम ४२०, ३४ भादवि

४) वाकोला पोलीस ठाणे, गु.र.क. ४०६/२०२४ कलम ४२०, ३४ भादवि

५) वाकोला पोलीस ठाणे, गु.र.क. ४०४/२०२४ कलम ४२०, ३४ भादवि


अटक आरोपी नाव व पत्ता -

सुनिल सरदारसिंग शिंदे उर्फ सुनिल विठ्ठल मावरे उर्फ देवीदास रामदास मावरे उर्फ राहुल नारायण खिल्लारे, वय ३८ वर्षे, धंदा - नाही, रा.ठि. मु. जूनुना पो. आंबा, ता. वसमत, जि. हिंगोली.


सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्‍त, बृहन्मुंबई श्री.विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुकत (गुन्हे) मुंबई श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशिकुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्‍त (प्रकटीकरण) श्री. दत्ता नलावडे व मा. सहा.पोलीस आयुक्‍त, प्रकटीकरण (मध्य) श्री. चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-३ चे प्रभारी पो.नि. दिपक सुर्वे, पो.उप.नि. सिरसाट , पो.ह. अनभुले, पो.ह. मांगले, पो.ह. गायकवाड व पो.ह. कांबळे यांनी पार पाडली आहे.

2540

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *