मुंबई, दि. १० : मुंबईत सध्या नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड मिळत आहे. गुरुवारी मुलुंड परिसरात एका कारमधून पोलिसांनी ४७ लाखांची रोकड जप्त केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सर्व हद्दीत नाकाबंदी करत आहेत. मुलुंड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी मुलुंडमधील बी आर रोड परिसरात नाकाबंदी केली होती. यावेळी एक कार तेथे आली. संशय आल्याने पोलिसांनी गाडी तात्काळ थांबवली। सदर कारची तपासणी केली असता त्यात ४७ लाखांची रोकड पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी रोख रक्कम, कार आणि चालकाचा ताबा घेतला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा