पोलिसांनी खुनाचा कट उधळला - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, १० एप्रिल, २०२४

पोलिसांनी खुनाचा कट उधळला

पॅरोलवर सुटलेला परत कारागृहात न जाता गोळीबार प्रकरणात अडकला


मुंबई, दि. १० : अँटॉपहिल गोळीबार प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने नुकत्याच बेड्या ठोकल्या. या आरोपीच्या टार्गेटवर आणखी दोघेजण असल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले आहे. कारवाईमुळे दोघांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. विवेक देवराज शेट्टीयार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात वेगवेगळ्या न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट जारी केली आहेत.


गुन्हे शाखेच्या कक्ष-४ ने ही कारवाई केली आहे. अँटॉपहिल नाईक नगर परिसरात ६ एप्रिल रोजी गोळीबार करून आरोपी पसार झाला होता. या हल्ल्यात अक्षय कदम उर्फ स्वामी हा जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी मित्रांसह टॅक्सी मध्ये आला आणि सायन कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या अक्षयच्या घराच्या त्याने दार वाजवले. अक्षय दरवाजा उघडतात आरोपीने त्याच्यावर गोळीबार केला. यात अक्षय गंभीर जखमी झाला. उपचारासाठी सायन रुग्णालयात त्याला हलवण्यात आले. याप्रकरणी अँटॉपहिल पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.


आरोपी कोरोना काळात पॅरोलवर सुटलेला- आरोपीला न्यायालयाने कोरोना कालावधीत पॅरोलीवर सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा कारागृहांमध्ये हजर झाला नव्हता. आरोपीकडे केलेल्या चौकशीत तो आणखी दोन व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली. मात्र, गुन्हे शाखेने वेळीच कारवाई केल्यामुळे दोघांचे प्राण वाचले आहेत.



पोलीस उपयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके बनवून आरोपीचा शोध सुरू केला असता आरोपी स्वतःची ओळख लपवून डोंबिवली विभागात लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-४ ला मिळाली होती. त्यानुसार कटई नाका परिसरातून आरोपीला सापळा रचून अटक केली असता त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये एक देशी बनावटीचे
पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व एक रिकामी पुंगळी पोलिसांना सापडली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज