Ticker

6/recent/ticker-posts

गुन्हे शाखा-३ ने मोटारसायकल चोरी करणाऱ्यास केली अटक

नवी मुंबईत यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन सहा गुन्हे उघडकीस आणले 


नवी मुंबई : कक्ष-३ गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार दिनेश जोशी यांना गुप्त बातमीदाराकडून नवी मुंबई परिसरात आरोपी करण रमेश शिंदे याने मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झाली होती. आरोपी हा वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलून तसेच मोबाईल नंबर बदलून स्वतःची ओळख लपवून राहत होता.

त्याच्याबाबत अधिक तपास करून नमूद आरोपीताचे नातेवाईक यांचे मोबाईल नंबर प्राप्त करून सी.डी.आर. वर टॉवर लोकेशन यांचे विश्लेषण करून नमूद आरोपी हा सुरत या ठिकाणी राहावयास असल्याची माहिती प्राप्त झाल्याने कक्ष -३ मधील पोलीस अधिकारी सपोनि संतोष चव्हाण, पोउनी आकाश पाटील, पोह दिनेश जोशी, सुधीर पाटील, चेतन जेजुरकर, राजेश मोरे हे वरिष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली सुरत येथे जाऊन आरोपीला त्याच्या ताब्यातील बुलेट मोटार सायकलसह ताब्यात घेऊन त्यास पुढील कारवाई करिता नेरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

उघडकीस आलेले गुन्हे-

१) नेरूळ पो ठाणे.

गु.र. क्र. 102/2024 कलम 379 भादवि.


2) खांदेश्वर पो ठाणे.

गु.र. क्र. 09/2023 कलम 379 भा द वि.


३) वाकड पो ठाणे, पिंपरी चिंचवड.

गु.र. क्र. 1236/2023 कलम 379 भादवि.


४) कदिम जालना पो ठाणे,

गु.र. क्र. 43/24 कलम 379 भादवि.


५) गांधी चौकी पो ठाणे.  

गु.र. क्र. 266/2023 कलम 379 भादवि.


६) खालापूर पो ठाणे,

गु.र. क्र. 13/2024 कलम 379 भादवि.


 जप्त मोटरसायकल-

1) MH 46 BR 3964 

(नेरूळ पो ठाणे गु र क्र 09/2023)


2) MH 06 AU 4643

(खांदेश्वर पो ठाणे. गु.र. क्र. 09/2023)


3) MH 14 JK

(वाकड पो ठाणे. गु.र. क्र. 1236/2023)


४) MH 16 CU 1143

(कदिम, जालना पो ठाणे. गु.र. क्र. 43/2024)


५) MH 24 AV 3055

गांधी चौकी पो ठाणे गु.र. क्र. 266/2023)

 

नमुद आरोपी याने आपले पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केले असल्यास मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो बेलापुर यांच्या न्यायालयातुन घेण्यात यावा.


संपर्क - सपोनि संतोष चव्हाण. ९९३०१८७९९९

पोउनि आकाश पाटील. ९५६११३०४७३

गुन्हे शाखा कक्ष -३ नवी मुंबई.


अशी माहिती कक्ष 3, गुन्हे शाखा, नवी मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या