रेल्वे मधील प्रवाशांना बोलण्यात गुंतवून ठेवून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

रेल्वे मधील प्रवाशांना बोलण्यात गुंतवून ठेवून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत संशयतरित्या वावरणाऱ्या तसेच  बोलबचन करणाऱ्या आरोपीस अटक  


गोवंडी  पोलीस ठाणे गु र क्रमांक - १०२/२०२४ कलम १२२(इ ) म.पो.का.


घटनास्थळ - एसबीआय बँकेच्या जवळ चंदन लॉन्स च्या बाजूला पांजरापोळ सर्कल चेंबूर, मुंबई. -७१.


गुन्हा घडला दिनांक वेळ - दि. १०/०४/२०२४ रोजी 02.45 वा. च्या दरम्यान गुन्हा घडला. 

तक्रारदाराचे नाव व पत्ता -

श्री. चंद्रकांत मनोहर हेमाडे, वय - ३४ वर्ष, धंदा - नोकरी पोलीस शिपाई क्रमांक १११९६०, रा.ठी. - पनवेल माथेरान रोड, ग्रीन हेवन को. ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी कोपर्ली गाव, जिल्हा रायगड.


हकीगत - नमूद गुन्हयातील अटक आरोपी हा सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत स्वतःच्या कब्जात एक लाल रंगाची प्लास्टिकची मूठ असलेली पक्कड जवळ बाळगून चोरी करण्याच्या उद्देशाने मिळून आला म्हणून त्याच्यावर वर नमूद कलमांअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


तपास-  फिर्यादीच्या तक्रारीवरून वर नमूद कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याच्या तपासात आरोपीच्या पूर्वअभिलेख तपासला असता तो खालील प्रमाणे मिळून आला आहे.

   

नमूद अटक आरोपी हा रेल्वे मधील प्रवाशांना बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्याकडून त्यांचे मोबाईल व एटीएम कार्ड काढून घेऊन त्यांची फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करीत आहेत.


अटक आरोपी :- १) निर्मल कुमार हसमुख भाई मृग. वय ४० वर्ष राहणार ठिकाण कडवा पाटील गाव अरडई, तालुका कटोडा संगाई, जिल्हा राजकोट, राज्य गुजरात.


त्याच्यावर आधी दाखल असलेले गुन्हे-

१) अहमदाबाद रेल्वे पोलीस ठाणे गु र क्र 2005/2010  U/s 379 भादवी.


२) सुरत रेल्वे पोलीस ठाणे गु.र. क्र. 11212051240196/24 U/s 420, 34 भादवी.


३) सी.एस.टी. रेल्वे पोलीस ठाणे, मुंबई गु.र. क्र. /2012 U/s 420, 34 भादवी.


त्याच्याकडून .दोन मोबाईल फोन, एक एटीएम कार्ड, रोख रक्कम 19,500 रुपये, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, एक लाल रंगाची प्लास्टिकची मूठ असलेली पक्कड हस्तगत करण्यात आली आहे. 


तपासीअधिकारी, पोलीस उपनिरीक्षक - मुकेश घोलप यांच्यासोबत तपास पथक म्हणून पो. उपनिरीक्षक मुकेश घोलप, पो.ह. 970555/ नागे., पो.शि. 111286/ माळवे, पो.शि. 111960/ हेमांडे. यांनी जबाबदारी निभावली. अशी माहिती गोवंडी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांनी दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज