मुंबई, दि. ६ : मुंबई क्राईम ब्रँच युनिट-७ ने सांगली येथे कारवाई करून ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला होता. ड्रग्ज प्रकरणात हवालामार्फत व्यवहार झाल्याचे समजताच पोलिसांनी जैसाभाई मोटाभाई माली या हवाला व्यवसायिकाला अटक केली. जेसाभाईच्या अटकेने अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे.
फेब्रुवारी महिन्यात युनिट-७ च्या पथकाने घाटकोपर येथे सापळा रचून एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम १२ लाख आणि दीड लाखांचे एमडी जप्त केले होते. तिने ते एमडी मिरा रोड येथून आणल्याचे तिच्या चौकशी समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी मिरा रोड येथे सापळा रुचून त्याच्याकडून ६ कोटींचे एमडी आणि ३ लाख ६८ हजार रोख रक्कम जप्त केली होती. त्याने सुरत येथून एमडी आणल्याचे समोर आले. त्यानंतर सुरत येथून पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्या चौकशीत त्यांनी ते ड्रग्ज सांगलीच्या कवठेमहाकालच्या इरळी गावातून आणल्याचे समोर आले. पोलिसांनी इरळी गावात छापा टाकून ड्रग्ज चा कारखाना उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत २५२ कोटी २८ लाखांचे एमडी जप्त केले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मित्राच्या घरातून तीन कोटी ४६ लाख रुपये जप्त केले होते. त्याच्या चौकशीत जेसाभाई या हवाला व्यवसायिकाचे नाव समोर आले. ड्रग्ज विक्रेत्याकडून आलेले पैसे तो मुख्य आरोपीला देत असायचा. हवालामार्फत पैशाचा व्यवहार झाला होता. अखेर पोलिसांनी जेसाभाईला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा