मुंबई : लोखंड चोरीसाठी रस्त्यावर पार केलेल्या मोटरसायकली चोरणाऱ्या चोराला पवई पोलिसांनी नुकत्याच बड्या ठोकल्या आहेत. विशाल कोळी असे त्याचे नाव असून त्याच्या अटकेमुळे आणखी १२ गुन्ह्यांची उकल करण्यात पवई पोलिसांना यश आले आहे.
पवई येथे राहणारे शेख यांची गेल्या महिन्यात मोटरसायकल चोरी झाली होती. मोटरसायकल चोरी प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक निरीक्षक संतोष कांबळे, टिळेकर, येडगे, झेंडे, सुरवाडे, शेट्टी, ठाकरे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना विशाल दिसून आला. पोलिसांनी चेंबूर येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.


0 टिप्पण्या