नागरिकांची आर्थिक फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

नागरिकांची आर्थिक फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी

मुंबई, दि. १८ : ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना सहज फसवले जायचे. मग फसवणुकीच्या पैशातून महागडे मोबाईल खरेदी करायचे आणि ते मोबाईल वेगवेगळ्या माध्यमातून विकून पैसे मिळवायचे अशा प्रकारे पद्धतशीर फसवणूक करून पैसे मिळवणाऱ्या एका रॅकेटला ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.


वरळी येथे राहणारा संकेत बडे याची आर्थिक फसवणूक झाली होती. अहमदाबाद येथे जायचे असल्याने संकेत भाड्याने गाडी शोधत होता. त्यासाठी तो गुगलवर सर्च करत असताना त्याला 'महादेव कार रेंटल डॉट कॉम' हे संकेतस्थळ दिसले. त्या संकेतस्थळावर हवी ती गाडी तसेच आवश्यक माहिती भरल्यानंतर त्याने क्रेडिट कार्डची माहिती भरल्यानंतर त्याला पेमेंट एरर असा संदेश आला. त्यावेळी समोरून संकेतच्या व्हाट्सअप वर एक लिंक आली. ती लिंक डाऊनलोड करून त्यात सर्व माहिती भरल्यावर देखील पुन्हा पेमेंटचा एरर संदेश आला. थोड्यावेळाने संकेतच्या क्रेडिट करून १ लाख ७९ हजार ९०० रुपये डेबिट झाल्याचा त्याला संदेश प्राप्त झाला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संकेतने ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे, पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नौशाद तांबोळी तसेच वाडते, गायकवाड, पगारे, पाटकर, सोनवणे, मुंडे, परब, अमोल पाटील या पथकाने तपास सुरू केला.


तपास सुरू असताना संकेतच्या पैशाने लोअर परेल येथील फिनिक्स मॉल येथून आयफोन प्रोमॅक्स हा मोबाईल खरेदी केला असल्याचे समजले. शेजान सय्यद या डिलिव्हरी बॉयने तो मोबाईल ताब्यात घेतला होता. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केल्यावर बीकेसीच्या भारत नगरात राहणाऱ्या सुरज निर्मल याला मोबाईल दिल्याचे कळले. सुरज कडे चौकशी केल्यावर त्याने त्याचा भाचा नारायण निर्मलकडे तो मोबाईल दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज