४२ लाखांचे एमडी जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

४२ लाखांचे एमडी जप्त

मुंबई, १७ : नागपाडा आणि अंधेरी येथे कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ४२ लाख रुपये किमतीचे २१० ग्रॅम एमडी जप्त केले आहे. या कारवाईत एका महिलेसह तीन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे.


अंधेरी पूर्वेकडील भंडारवाडा येथे काही जण ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती घाटकोपर कक्षाला मिळाली होती. पथकाने सापळा रचून पवई, आरे कॉलनी रोडवरील रहिवाशी रेणुका कांबळे (वय, २८) शादाब सलीम मुल्ला उर्फ मस्तान उर्फ पप्प्या (वय, २६) यांना ताब्यात घेत अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी १८ लाख रुपये किमतीचे १० ग्रॅम एमडी जप्त केले आहे. एक सराईत गुन्हेगार ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती मैदान पोलीस कक्षाला मिळाली होती. आझाद मैदान कक्षाच्या पथकाने ड्रग्ज तस्कराला २४ लाख रुपये किमतीच्या १२० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेतले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज