१९३० या पोलीस हेल्पलाईनमुळे व्यावसायिकाचे ३५ लाख वाचले - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

१९३० या पोलीस हेल्पलाईनमुळे व्यावसायिकाचे ३५ लाख वाचले

 पोलीस असल्याचा बनाव


मुंबई, दि. १९ : मुंबई पोलिसांच्या १९३० सायबर हेल्पलाइनमुळे दक्षिण मुंबईतील व्यवसायिकल ३५ लाख १२ हजार ८२९ रुपये परत मिळाले. कुरियर कंपन्यांच्या नावाने या टोळीने व्यवसायिकाला जाळ्यात ओढून खात्यात गैरव्यवहार झाल्याचा बनाव करत फसवणूक केली होती.


१३ एप्रिलला व्यवसायिकाला आरोपीने पोलीस अधिकारी, आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यात अनधिकृत व्यवहार झाल्याचा बनाव केला. कारवाईची भीती घालून त्यांना ३५ लाख १२ हजार ८२० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यवसायिकाने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधून फसवणूक झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भोर व पोलीस अंमलदार किरण पाटील यांनी एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करून संबंधित बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. या कारवाईमुळे तक्रारदाराची फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यात गोठवण्यात पथकाला यश आले आहे.


पोलीस उपयुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबुराव सोनवणे, सायबर गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


नामांकित कुरिअर कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून आपल्या बँक खात्यांमधून अनियत व्यवहार झाल्याचा किंवा आपल्या नावे ड्रग्ज, हत्यारे, हवाला ट्रांजेक्शन झाल्याचे सांगून या रॅकेटचे लोक संपर्क साधतात. तसेच पोलीस अधिकारी, इन्कम टॅक्स अधिकारी किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखपत्र किंवा नोटीस पाठवून आपल्याला अटक करण्यात येईल अशी भीती दाखवत आहेत. अशा वेळी घाबरून न जाता थेट जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज