१३ अल्पवयीन बाल भिक्षेकऱ्यांची सुटका - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

१३ अल्पवयीन बाल भिक्षेकऱ्यांची सुटका

मुंबई, दि. १५ : मुंबई पोलिसांच्या विशेष बाल पोलीस कक्षाने मालाड येथे कारवाई करून १३ अल्पवयीन बाल भिक्षेकरूंची सुटका केली. त्या तेरा मुलांची रवानगी बालगृहात केली आहे. या प्रकरणी बांगुर नगर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.


मालाड परिसरात बाल भिक्षेकरूंकडून भिक्षा मागितली जाते अशी माहिती विशेष बाल पोलीस कक्षाला मिळाली होती. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळणी केली असता पोलिसांना १३ अल्पवयीन मुले परिसरात भिक्षा मागत असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोतदार यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला असता पोलिसांनी मालाडच्या मिंट चौकी येथे कारवाई करून १४ अल्पवयीन बाल भिक्षेकऱ्यांची सुटका केली. अल्पवयीन मुलांना भिक्षा मागायला लावून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या चार जणांविरुद्ध बांगुर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुटका केलेल्या १३ अल्पवयीन मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज