Ticker

6/recent/ticker-posts

२७ लाखांचे हिरे घेऊन यूपीला पळालेल्या आरोपीस अटक

मुंबई, दि. १४ : सात वर्षांपूर्वी एका सराफाकडून जवळपास २७ लाखांचे हिरे घेऊन पसार झालेला भामटा उत्तर प्रदेशात जाऊन लपला होता. मुंबई गुन्हे शाखेने त्याला तेथे जाऊन अटक केली असून भोलाप्रसाद वर्मा असे त्या आरोपीचे नाव आहे.

२०१७ मध्ये भोलाप्रसाद याने एका हिरे कंपनीच्या मालकाचा विश्वास संपादन करून कंपनीचे ८७.७५ कॅरेटचे हिरे घेतले होते. मात्र ते हिरे हातात पडताच भोलाप्रसादने फसवणूक करत हिर्‍यांसह तेथून पळ काढला. ही गोष्ट कंपनी मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वांद्रे-कुर्ला संकूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भोलाप्रसादचा शोध सुरू केला होता.


पण, त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. गुन्हे शाखा युनीट-८चे पथकदेखील त्याचा शोध घेत होते. अखेर भोलाप्रसार यूपीमध्ये लपून राहत असल्याची माहिती काढल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहूल प्रभू, उपनिरीक्षक विकास मोरे तसेच यादव, सटाले या पथकाने यूपी मधील गोरखपूर येथे जाऊन भोलाप्रसाद याला तेथे जाऊन अटक केली व  पकडून मुंबईला आणले.

Photo : viral

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या