सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी केक कापून साजरा केला महिला दिन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी केक कापून साजरा केला महिला दिन

खाकीतील सखी उपक्रमांतर्गत क्यूआर कोडबाबत जनजागृती

८-३-२०२४

मुंबई, दादासाहेब येंधे :  आज जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मा. डॉ. श्री. रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांचे संकल्पनेनुसार सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे परिसरामध्ये ८ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्याकरिता पोलीस ठाणे समोरील प्रांगणात महिला पोलीस अधिकारी, अंमलदार व महिला दक्षता समिती सदस्य यांच्याकडून केक कापण्यात येऊन महिला रेल्वे प्रवासी यांना गुलाब पुष्प देऊन प्रवासी दक्षतेबाबत पत्रके देण्यात आली.  तसेच खाकीतील सखी या उपक्रमांतर्गत रेल्वे स्टेशन वर तसेच महिलांच्या राखीव डब्यात महिला प्रवासी यांना खाकीतील सखी QR कोड बाबत (COTO) ॲप ची माहिती असलेले पत्रके देखील वाटण्यात आली.

तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच महिला पोलीस अंमलदार यांना मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सीएसएमटी विभाग श्री.सुनील गावकर यांचे शुभ हस्ते माननीय पोलीस आयुक्त,लोहमार्ग मुंबई यांनी स्वसाक्षांकीत केलेली प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी तसेच कीर्ती महाविद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी महिलांची सुरक्षितता या विषयावर पथनाट्य सादर करून जनजागृती केली. त्यानंतर नकलाकार श्री. राहुल सरोदे यांनी बोलक्या बाहुल्यांचा शो सादर करून जनजागृती केली. 

सदर कार्यक्रमाकरिता मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सीएसएमटी विभाग श्री. सुनील गावकर तसेच सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे मधील महिला पोलीस अंमलदार, रेल्वे सुरक्षा बल, सीएसएमटी येथील महिला कर्मचारी, सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथील तिकीट तपासणीस महिला कर्मचारी, सीएसएमटी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्या तसेच महिला प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात महिला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला व उपक्रमाबद्दल महिला रेल्वे प्रवाशांकडून कौतुक करण्यात आले. अशी माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज