नोकरीच्या आमिषाने मुलीला देहविक्रीत लोटले - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ७ मार्च, २०२४

नोकरीच्या आमिषाने मुलीला देहविक्रीत लोटले

मुंबई, दि. ७: अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून मुंबईत आणून वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने केलेल्या कारवाईत पोलिसांनी छाया उर्फ अम्मा लक्ष्मण देवरकी (वय, ४६) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार छाया नावाची महिला ग्राहकांना अल्पवयीन मुली पुरवून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने साकीनाका भागातून एका अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका केली.


संबंधित महिलेने मुलीला चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे पालकांना आमिष दाखवत मुंबईत आणले होते. त्यानंतर तिला वेश्याव्यवसायात ढकलले. तिचे पैसेही तीच घेत असल्याचे समोर आले. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज