मुंबई, दि. ११ : गुन्हे शाखेने 'यात्री क्लब ऑफ हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड' या फॉरेन टूर पॅकेज सेवा देणाऱ्या कंपनीची स्थापना करून फॉरेन टूर पॅकेज क्लब मेंबरशिपच्या नावाने फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकांना बेड्या ठोकल्या आहेत. हिमांशू तिवारी( वय, २७) आणि नुमान कैंसर (वय, २८) अशी आरोपींची नावे असून दोघेही मूळचे उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहेत.
फॉरेन टूर पॅकेज क्लब मेंबरशिपच्या नावाने केलेल्या ६ लाख ७० हजार रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी घाटकोपर येथे तर पाच लाख ११ हजार आठशे रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
गुन्हे शाखेच्या प्रकटीकरणाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाने तपास सुरू केला. गुन्हा दाखल होताच फसवणूक करणाऱ्या 'यात्री क्लब ऑफ हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीचे संचालक तिवारी आणि कैसर यांनी साकीनाका परिसरात सुरू केलेल्या कंपनीचे तीन कार्याये बंद करून पसार झाले. गुन्ह्यातील तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने गुन्हे शाखेने गोरखपूर मधून तिवारीला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार कैसर अंधेरीत असल्याचे समोर आले.
2447
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा