Ticker

10/recent/ticker-posts

मानखुर्दमध्ये हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

मुंबई, दि. १० : मानखुर्द मधील एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करत पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. फैसल ऊनहुलहक सिद्दिकी उर्फ नागोरी असे त्याचे नाव असून हत्येचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, घातक हत्यारांनी हल्ला, नुकसान, दंगा, गृह अतिक्रमण, भेसळ, अपायकारक आणि अंमली पदार्थांची विक्री करणे अशा विविध गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद आहे.

मानखुर्द मधील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीवर ९ फेब्रुवारीला नागोरी याच्यासह अशपाक खान उर्फ बब्बू राशीद जग्गा आणि इस्माईल शेख यांनी धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सराईत गुन्हेगार नागोरी हा मुंबईतून पसार झाला.

गुजरात, राजस्थान, दिल्ली येथे वास्तव्याचे ठिकाण सतत बदलून नागोरी हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या मागावर असलेल्या विशेष पोलीस पथकाने अखेर त्याला दिल्लीतून ताब्यात घेत अटक केली. दिल्लीतील न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन नागोरीला बुधवारी मुंबईत आणण्यात आले. त्याला न्यायालयाने ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.




Mnk 307

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या