श्लोक सत्यवान नर याची दमदार शतकी खेळी
मुंबई, दि. २० : रोजी आझाद मैदान येथे झालेल्या १४ वर्षांखालील एम. आय. ज्युनियर टुर्नामेंट मध्ये बालमोहन विद्यामंदिर इंग्रजी माध्यम - दादर विरुद्ध रायन इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ सामन्यात बालमोहन विद्यामंदिर, दादरने दणदणीत विजय मिळविला. संघासाठी खेळताना कुमार श्लोक सत्यवान नर याने ६३ चेंडूत १६ चौकार १ षटकार लगावत १०४ धावांचा डोंगर रचला. तर कु. विवान रेडकरने ७४ चेंडूत ५२ धावा केल्या. तसेच कु. वेद खंबाटे याने ६ ओव्हर मध्ये ३६ धावा देत ०३ विकेट घेतले आणि संघासाठी विजय खेचून आणला. कु. श्लोक याने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरविण्यात आले.

बालमोहन विद्यामंदिरच्या यशाबद्दल शाळेचे प्रशिक्षक श्री.आदित्य कदम ,श्री.गणेश मोरे ,शिक्षक व क्रिकेट प्रेमींनी अभिनंदन केले. तसेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा