मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात आज एका विशेष कार्यक्रमात सत्यवान नर संकलित सन २०२६ च्या 'मंथली प्लॅनर' चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
सत्यवान नर यांनी अत्यंत कल्पकतेने तयार केलेल्या या 'मंथली प्लॅनर'चे अनावरण माननीय आमदार श्रीकांत भारतीय आणि कार्यालय सचिव मुकुंदजी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्लॅनरमध्ये २०२६ सालातील महत्त्वाचे सण, शासकीय सुट्ट्या आणि नियोजनासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार श्रीकांत भारतीय यांनी सत्यवान नर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. दैनंदिन कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि वेळेचे अचूक नियोजन करण्यासाठी हा प्लॅनर अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यालय सचिव मुकुंदजी कुलकर्णी ,व श्री.विश्वास फाटक (प्रवक्ते-भा ज पा)यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास कार्यालयातील प्रमुख पदाधिकारी श्री,ओमप्रकाश चौहान-प्रवक्ते भाजपा,अर्जुन गुप्ता,मुसळे,बाळा काणेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सत्यवान नर यांनी सर्वांचे आभार मानले.

0 टिप्पण्या